Solapur Mandir Demolition : सोलापुरात पालखी मार्गावरील मंदिर रातोरात पाडलं, ग्रामस्थ सरकारवर नाराज
Continues below advertisement
सरकारने सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गावरील मंदिर रातोरात पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय... सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पोखरापूरमधील जगदंबा देवीचे पुरातन मंदिर जमीनदोस्त करण्यात आलंय... वास्तविक मंदिराचे शास्त्रीय पद्धतीनं स्थलांतर करावं... मंदिराचं कसलंही नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिलं होता... तरीही हिंदुत्वाचं नाव घेणाऱ्या सरकारने आणि अफजल खानाच्या वृत्तीच्या ठेकेदारांनी मंदिर पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलंय... दरम्यान मंदिर जमीनदोस्त केल्यानंतरही देवीची मूर्ती भर उन्हात जागेवरच आहे... हे दृष्य पाहून भाविकांना अश्रू अनावर होत आहेत...
Continues below advertisement