Solapur Crime : मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSolapur Crime : मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण
मुलींची छेड का काढतो? याचा जाब विचारत सोलापुरात एका भाजीविक्रेता तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. अयान मुर्तूज बागवान असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. अयाविरोधात परिसरात राहणाऱ्या मुलींची छेड काढल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसारही गुन्हा दाखल झाला. याचाच जाब विचारत मुलीच्या भावाने आपल्या मित्रांसह अयानला रिक्षात बसवून एका ठिकाणी नेले. तिथे त्याला अमानुष मारहाण केली. दरम्यान अयानला मारहाण केल्याने १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण वैयक्तिक असून कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. पोलीस कसून चौकशी करत असल्याची प्रतिक्रिया सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.