BJP Meeting Delhi : दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, राज्यातील 25 जागांबाबात चर्चा

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील जवळपास 25 जागांवर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती. नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार,जालन्यातून मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती. दुसरीकडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार, आणि भिवंडीतून कपिल पाटील यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती. भाजपच्या केंद्रीय निवड समितीच्या बैठकीत 2019 साली जिंकलेल्या 23 आणि पराभव झालेल्या चंद्रपूर आणि बारामती अशा 2 जागांवर चर्चा झाली. चंद्रपूरच्या जागेवर सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाऊ शकतं. तर बारामतीची जागा अजित पवार गटाला दिली जाण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola