Solapur Band : महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य सोलापुरात बंदची हाक, पोलीस सतर्क
Continues below advertisement
Solapur Band : महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक देण्यात आलीय. सोलापुरातल्या श्री शिवजन्मोत्सव मधवर्ती महामंडळाने हा बंद पुकारलाय. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि मुस्लिम ब्रिगेडने पाठिंबा दिलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नऊ पोलिस निरीक्षक, २७ सहाय्यक पोलिस निरीक्षक, तसेच १५४ पोलिस शिपाई तैनात ठेवण्यात आले आहेत. त्याचसोबत, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार टीम आणि नऊ स्ट्रायकिंग फोर्स तैनात ठेवले आहेत. दरम्यान, सकाळपासून सुरू होणारे सगळे व्यवहार ठप्प असून, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीही पूर्णपणे बंद ठेवण्यात आलीय.
Continues below advertisement