Solapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर : आज सोलापूर विमानतळाचे (Solapur Airport) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्याचं दिसून आले. जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार, 1 विधानपरिषद सदस्य, दोन खासदार आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील या दोन महाविकास आघाडीच्या खासदारांसह महायुतीच्या बहुतांश आमदारांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. सोलापूर विमानतळाचे उदघाट्न कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने असले तरी प्रशासनाने सोलापूर विमानतळावर या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांना देखील देण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप आमदार सुभाष देशमुख आणि माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य वगळता एक ही आमदार, खासदार गैरहजर होते. तर आपण सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. तर आपल्याला निमंत्रण होते त्यामुळेच आपण आलोय, इतरांबद्दल कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. जायसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला दांडी मारलेल्या आमदार खासदारांनी कारणं दिली आहेत