Solapur Siddharameshwar Temple | श्रावण महिन्यानिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. शेकडो वर्षे जुनं असलेलं सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यांचं हे मंदिर आहे. लॉकडाऊनमुळे सध्या हे मंदिर बंद आहे, मात्र या सजावटीने सर्वांना आकर्षिलं आहे.