Ganeshotsav 2020 | बाप्पाचे सुवर्णालंकार घडवणारे कारागीर संकटात, दागिने घडवण्यासाठीच्या ऑर्डर्स रद्द
कोरोनाचं संकट देशात आल्यामुळे आगामी गणेशोत्सवात उंच मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये असं आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे उंच मूर्ती नसल्याने चार महिन्यांपूर्वी सराफ बांधवांकडे दागिने घडवण्यासाठी नोंदवलेल्या ऑर्डर्स मंडळांकडून रद्द झाल्या. कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटल्याने यंदा घरगुती बाप्पांच्या दागिन्यांची मागणी देखील घटली आहे. त्यामुळे बाप्पाला यंदा दागिन्यांचा साज नसेल हे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांना गिरगावातल्या नाना वेधक यांच्या दागिन्यांचा साज चढविण्यात येतो. कोरोनाच्या संकटामुळे यंदा या कामावरदेखील मंदी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं नाना वेधक यांनी सांगितलंय.
Tags :
Ganesh Jewelry Nana Vedhak Ganpati Aagman Ganpati 2020 Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Ganesh Idol Special Report