Sharad Pawar : शरद पवार यांचा सोलापूर दौरा पुढे ढकलला, सुशीलकुमार शिंदेही कार्यक्रमाला जाणार नाहीत
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा सोलापूर जिल्ह्याच्या दौरा पुढे ढकलण्यात आलाय. आज सकाळी शरद पवार माढा तालुक्यातील कापसेवाडीमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा घेणार होते. त्यानंतर पंढरपूरमध्येही मेळावा घेणार होते. या मेळाव्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेही उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवारांनी दौरा पुढे ढकलल्यानंतर सुशीलकुमार शिंदेही या कार्यक्रमाला जाणार नाहीत.
Continues below advertisement