Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही

Continues below advertisement

Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही

नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. अशातच काल (30 नोव्हेंबर) रात्री सांगोल्याचे (Sangole) माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने (Election Commission) छापा टाकला आहेयावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे (Eknath Shinde Shivsena) कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत.

BJP vs Shivsena: सेना भाजप वादाचा पुढचा अंक

सांगोल्यात (Sangola Election) भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे. यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजीबापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच काल ( रविवारी) दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

सांगोल्यातील छापेमारी मागे देवेंद्र फडणवीस नाहीत ..
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना माजी आमदार दीपक साळुंखे यांनी षडयंत्र करून ही कारवाई केली ..
शहाजीबापू पाटील यांचा गंभीर आरोप
शहाजी बापू वाघ आहेत ..
अशा कारवायाला घाबरणार नाही ..
पुष्पातील झुकेगा नही साला डायलॉग मारला

शहाजी बापू सध्या खूप आजारी असून एबीपी माझा शी बोलताना वारंवार त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते .. मी तर पक्षाकडून मिळालेल्या दगाबाजीचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर दिसत होता
आता सांगोल्याची निवडणूक जनतेने हाती घेतली असून गुलाल हा आमचाच असेल असाही दावा त्यांनी केला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola