Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
देखील मोठी उलथापालत सुरू झाली आहे. बघूयात. दितवा. याच वादळाच्या नावान श्रीलंकेच्या नंतर भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकी भरली आहे. याची कारण म्हणजे या चक्रीवादळात इथे घातलेल थैमान श्रीलंकेच्या नंतर तमिळनाडू आणि पंडीचेरीच्या किनाऱ्यावर कुड्डालोर, नागपट्टिनम, मैला दुथुराई, बिल्लूपुरम, चेंगलपट्टू यासारख्या परिसरामध्ये इथून पुढे काही दिवस मुसळधार पावसाचे असणार आहेत. श्रीलंकेमध्ये दितवाहमुळे पूर आणि भूस्खलन झालं. 150 पेक्षा अधिक सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झालाय तर अजूनही 200 पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. याच चक्रीवादळाचा श्रीलंका, इंडोनेशिया, वियतनाम. मोठ्या पावसाची नोंदही झालेली आहे आणि पुढील काही तासांमध्ये म्हणजे आज मध्यरात्रीपर्यंत या चक्रवादयाची तीव्रता कमी होऊन त्याच डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर होऊ शकत. भारतान श्रीलंकेच्या मदतीसाठी ऑपरेशन सागर सिंधू सुरू केलेल असताना आता हे वादळ भारताच्याच किनारपट्टीवरती धडकल्यामुळे आपल्या प्रशासनासमोरचा आव्हान देखील मोठ आहे. भारतीय वायुसेनेच आयएल76 हे विमान कोलंबोला पोहोचल हवाई आणि सागरी मार्गान आतापर्यंत सुमारे 27 टन मदत सामग्री पोहोचवण्यात आली. तमिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची 28 पेक्षा अधिक आपत्कालीन पथक तैनात करण्यात आली आहेत. तर पूर्व किनारपट्टीच्या मदतीसाठी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र आणि गुजरात मधील एनडीआरएफची पथक देखील पोहोचली आहेत. तर या चक्रीवादळाचा परिणाम. विमान उड्डाणांवरती देखील मोठ्या प्रमाणावर होतो आहे. तमिळनाडू मध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारी 54 विमानांची उड्डाण रद्द झाली आहेत. चेन्नई मधल्या विमानांची उड्डाण रद्द झाल्यामुळे कोलंबो विमानतळावरती सुमारे 300 भारतीय प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून अडकून पडल्यात. पुदुचरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने चक्रीवादळामुळे सुट्टी जाहीर करून सगळ्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या. पुदुचरी, कराईकल, माहे आणि यनम मधील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय झाला आहे. दितवा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या तळकोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये 11 ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये तुरळक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडाका देखील वाढणार आहे. त्यामुळे या चक्रीवादळाच संकट लवकरात लवकर टळावं आणि कमीत कमी नुकसान व्हावं हीच अपेक्षा. भूकंप, मग ज्वालामुखी आणि त्यानंतर एका चक्रीवादळामुळे आता अतिवृष्टीचा देखील सामना करावा लागतोय.