Solapur : तोंडले बोंडले येथे संत ज्ञानेश्वर आणि सोपान काकांच्या पालखीची बंधूभेट
Solapur : तोंडले बोंडले येथे संत ज्ञानेश्वर आणि सोपान काकांच्या पालखीची बंधूभेट
आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोहळ्याने वेळापूरहून भंडी शेगावच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय. सकाळी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी गोल रिंगण पार पडल्यानंतर दुपारी तोंडले बोंडले या ठिकाणी माऊलींची आणि संत सोपान काका यांची बंधू भेट झाली... या दोन्ही पालख्या एकाच मार्गावर आल्यानंतर एकमेकांच्या शेजारी उभा करण्यात आल्या... यावेळी माऊलींच्या पालखीतून मानाचे नारळ सोपान काकांच्या पालखी देण्यात आला.. आणि सोपान काकांच्या पालखीतून माऊलींच्या पालखीला मानाचे नारळ देण्यात आले...