Pandharpur Unseasonal Rain : पंढरपूर तालुक्याला अवकाळीचा फटका; रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता

Continues below advertisement

Pandharpur Unseasonal Rain  : पंढरपूर तालुक्याला अवकाळीचा फटका; रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता पंढरपूर तालुक्यात ११हजार एकरावरील द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसला असून सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागाना दणका बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलं आहे. आज पहाटे पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला तर पटवर्धन कुरोली येथे २० आणि चले भागात १७ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. शिवाय भुरी,दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram