Pandharpur : एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण, वारकऱ्यांकडून ग्रंथदिंडीचं आयोजन

Continues below advertisement

शांतिब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या भागवत ग्रंथाला ४५० वर्षे पूर्ण झाल्या प्रित्यर्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने नामदेव पायरीपासून भागवत ग्रंथाचा हत्तीवरून भव्य ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाला . तब्बल ४५० वर्षांपूर्वी भागवत ग्रंथाचे काम पूर्ण झाल्यावर श्रीक्षेत्र काशी येथे एकनाथ महाराज आणि भागवत ग्रंथाची अशाच पद्धतीने हत्तीवरून मिरवणूक काढून सन्मान करण्यात आला होता . याच दिवसाच्या आठवणी निमित्त आज वारकरी पाईक संघ आणि इतर वारकरी संघटनांच्या कडून या भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली . तासगाव संस्थांच्या गौरी या हत्तीणीवर नाथ महाराजांचे भागवत ग्रंथाला ठेऊन नामदेव पायरीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली . दोन्ही बाजूने फुलांच्या पुष्पवृष्टीत आणि टाळ मृदूंगाच्या जयघोषात प्रदक्षिणा मार्गावरून भागवत ग्रंथदिंडी काढण्यात आली . यावेळी दुतर्फा हजारो वारकर्यांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती . या ग्रंथदिंडीचे आयोजन देवव्रत महाराज वासकर आणि भागवताचे गाढे अभ्यासक डॉ भागवत कानडे यांनी केले होते . या सोहळ्यासाठी एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी , संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज , पंढरपुरातील फडकरी , मठाधिपती आणि  हजारो वारकरी उपस्थित होते . संत एकनाथ महाराज यांच्या जलसामधील ४२५ वर्षे तर एकनाथी भागवत ग्रंथास ४५० वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram