Manoj Jarange Sabha : करमाळ्यातील वांगीमध्ये मनोज जरांगेंची पहाेट चार वाजता सभा पार : ABP Majha
Continues below advertisement
मनोज जरांगे यांची आज पहाटे चार वाजता करमाळा तालुक्यातील वांगी इथे सभा पार पडली. बुधवारी संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या सभेला पोहोचण्यासाठी जरांगेंना पहाटेचे चार वाजले. तरीही थंडीत कुडकुडत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सभेसाठी थांबले होते. जरांगे देखील समाजाचं प्रेम पाहून भारावून गेले आणि आरक्षण आंदोलनातील ही सभा मराठा समाज कधी विसरणार नाही असं सांगितलं. पहाटेची वेळ आणि थंडीच्या कडक्यामुळे जरांगे यांनी पाच मिनिट बोलून निरोप घेतला. यावेळी राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
Continues below advertisement