
Raj Thackeray on NCP : NCPच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातीयवाद, राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. आगामी 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जातीयवादाचा धोका आ वासून उभा आहे. तो प्रचंड धोकादायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद खूपच उफाळून आला आहे, असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा आरोपांची तोफ डागली आहे.
Continues below advertisement