Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
ळशिरस विधानसभेला भाजप उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर आपल्याला दिली होती .. अगदी मला घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गेले होते मात्र आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही हे मी सांगून आलो होतो .. निवडणुकीला चार दिवस उरले असताना ही ऑफर 50 कोटी रुपयांपर्यंत गेली होती असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज प्रचाराच्या सांगता सभेत केला. अकलूज येथील विजय चौकात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही प्रचाराची विराट सांगता सभा झाली. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महबूब शेख आणि उभाठाचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे शिंदे उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते. यावेळी जानकर यांना निवडून आणण्याचा शब्द आपण दिला होता आणि तो पाळण्यासाठी आपण ती ऑफर धुडकावली पण शब्द मोडला नाही असे मोहिते पाटील यांनी सांगितले. राम सातपुते जेव्हा सोलापूर लोकसभेला उभा राहिला निघाला होता तेव्हा त्याला तू उभा राहू नकोस पडशील असे स्पष्ट मी सांगितले होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय दादांना मानणारे 80 हजारापेक्षा जास्त मतदार असल्याने तू दादांना दगा देऊन तिकडे गेल्यास तुझा पराभव नक्की होईल असे सांगूनही सातपुते यांनी ऐकले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पुन्हा माळशिरस मध्ये निवडणूक लढविण्यासाठी ते आले असता तू उभारू नकोस पुन्हा पडशील असे त्याही वेळी सांगितले होते. गेल्या वेळी नुसत्या अकलूज करांनी तुला 19 हजाराचे लीड मिळवून दिले आणि त्यावेळी जानकर यांचा फक्त 2600 मताने पराभव झाला याची आठवण जयसिंह मोहिते पाटील यांनी करून दिली.