Solapur Waterlogging | सोलापूर, परंड्यात पूर, शेतीचं मोठं नुकसान, वाहतूक ठप्प!
Continues below advertisement
परंडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, चांदणी नदीला पूर आला. यामुळे वारशीकडे जाणारा सहा ते सात गावांचा संपर्क तुटला, वाहतूक बंद. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिक त्रस्त झाले, पुलाची उंची वाढवण्याची मागणी करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. बक्षी हिप्परगा गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले, खरीप पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. सोलापूर शहरात रात्री पाऊस पडतो आणि दुपारी वातावरण कडक होते. जुना पुणे नाका परिसरातील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नदी-नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. जलसंपदा विभागाने हिप्परगा तलावातून पाणी सोडल्याने जुना पुणा नाक्यातील ओढ्याची पातळी वाढली. प्रशासनाने नागरिकांना रस्त्यावरून प्रवास न करण्याचे आवाहन केले, स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement