Ravindra Phatak | शिंदेंच्या शिवसेनेचे MLA रवींद्र फाटक यांना 26 कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीला गिरगाव कोर्टाने दिलासा दिला आहे. 2015 सालच्या 26 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नीची निर्दोष सुटका झाली आहे. या प्रकरणात फाटक यांच्यासह एकूण आठ जणांची सुटका करण्यात आली. ठाण्यातील एका भूखंडाच्या मालकी हक्कावरून फाटक यांच्याविरोधात त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दोन्ही भागीदारांमधील वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे कोर्टाने नमूद केले. बचाव पक्षाने युक्तिवाद केला होता की, विवादित रक्कम आधीच दिली गेली होती. कोर्टाने हा युक्तिवाद मान्य करत फाटक आणि इतरांची निर्दोष सुटका केली. या निर्णयामुळे रवींद्र फाटक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.