Solapur Farmer Loss | पाहणी दौऱ्यावर शेतकऱ्यांचा संताप, दोन महिन्यांनंतर दमडीचीही मदत नाही

Continues below advertisement
मराठवाडा परिसरात केंद्राच्या पथकाने पाहणी दौरा केल्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रात केंद्राचे पथक पाहणी दौरा करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे सुरुवातीला पथकाने पाहणी दौरा केला. सीना नदीच्या शेजारी असलेल्या तात्या चंदनशिवे यांच्या ऊसाच्या शेतीचं झालेल्या नुकसानीची पाहणी पथकाने केली. लांबोटी येथील पुलावरूनच पथकाला पाहणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दौरा किती वरवरचा आहे हे आपल्याला कळेल. अतिवृष्टी होऊन दोन महिने झाले तरी ज्या शेतकऱ्याच्या शेतीची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे त्यांना एक रुपयांची मदत देखील अद्याप मिळलेली नाहीये. त्यामुळे केंद्रीय पथक तेही प्रामाणिक पणे प्रयत्न करून मिळवून देईल अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram