Pune News | पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन, बावधन परिसरात दिसलेल्या गव्याला बाहेर काढण्यात यश

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. बावधन परिसरात हा गवा आढळला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारची हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी अर्थात HEMRL नावाची संस्था आहे. हा गवा सध्या या संस्थेची कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे आहे. HEMRL संस्थेच्या पलिकडे टेकडी आणि दाट झाडी आहे. या गव्याला पकडण्याऐवजी त्याला पुन्हा दाट झाडीमध्ये घालवून देण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola