Solapur: बनावट तेल बनावणाऱ्या कारखान्यावर छापा,पोलिसांकडून 2 जणांना अटक :Abp Majha
जनावरे कत्तल केल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या टाकाऊ पदार्थांपासून बनावट तेल आणि वनस्पती तूप सदृश पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केलीय. सोलापूर-तुळजापूर महामार्गावर शिवारात असलेल्या कारखान्यावर धाड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. पोलिसांनी विशेष पथक पाठवून या ठिकाणी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कत्तलखान्यातील टाकाऊ मांस आणि हाडे मोठमोठ्या कढाईमध्ये शिजवून त्यापासून तेल आणि वनस्पती तूप सदृश्य पदार्थ निर्मिती सुरू असल्याचं निष्पन्न झालं. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन कामगारांना ताब्यात घेतलेलं आहे. प्राथमिक तपासामध्ये कारखान्यासाठी वापरली जाणारी वीज देखील चोरीची असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी देखील या कारखाना चालकांनी घेतलेली नाही. अतिशय घाणीत तयार केला जाणारा पदार्थाची विक्री नेमकी कुठे केली जात होती हा मात्र मोठा प्रश्न आहे..घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.