Kartiki Ekadashi 2022 : कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांची चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.  यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. दरम्यान आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विठ्ठलाची महापुजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी सुरु करण्यात आलं... कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागेतिरी स्नानासाठी गर्दी केलीय. एबीपी माझाच्या बातमीनंतर वारकऱ्यांचं हे स्नान आता सुरक्षित झालं आहे. काही दिवसांपूर्वी उजनीतून पाणी सोडल्यानं चंद्रभागेची पाणीपातळी वाढली होती. एबीपी माझाने याबाबत वृत्त दाखवल्यानं उजणीतून येणारं पाणी बंद करण्यात आलं. त्यामुळे चंद्रभागेची पाणीपातळी पुन्हा खाली गेली आणि भाविकांना स्नान करणं सुरक्षित झालंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola