Solapur Rajesh Kale सोलापूरच्या उपमहापौराला अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद
पिंपरी चिंचवड : सोलापूरचा उपमहापौर राजेश काळेला अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळेला ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळेने कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळेला नोटीस देऊन सोडण्यात आले.
खरंच काळेला ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काळेला शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळेने पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळेने हा बहाणा केल्याचं बोललं जातंय.