ABP News

Chandrakant Patil Shai Fek : सोलापुरात भीम आर्मीकडून चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

सोलापूर : सोलापुरच्या (Solapur) पालकमंत्री पदाचा भार स्विकारल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अजय असं या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.  सरकारी नोकऱ्यांमधलं खासगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram