CCH Scam : पैसा दुप्पट करण्याचं आमिष, फसवणुकीनंतर अनेकांची पोलीस ठाण्यात धाव

Continues below advertisement

 सोलापुरात ऑनलाईन ऍपद्वारे गुंतवणूक केलेल्या कोट्यावधी रुपये बुडाल्याची चर्चा सुरु आहे. CCH म्हणजेच क्लाऊड मायनर ऍप या विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यानंतर चक्क दाम दुप्पट होत असल्याचे नागरिकांमध्ये पसरले. यानंतर सोलापुरातील शेकडो लोकांनी पैसा गुंतवला. हा गुंतवणूकीचा आकडा 1 हजार कोटी पर्यंत असल्याची शक्यता दैनिक लोकमत या वृत्तपत्राने व्यक्त केली आहे. या अमेरिकन ऍपमध्ये वरच्युल स्वरूपात व्यवहार चालत होते. लोकांनी आपला पैसा गुंतवल्यानंतर त्यांना ऍपमध्येच डॉलरमध्ये दररोज मोठे रिटर्न मिळत होते. सुरुवातीचे काही दिवस लोकांना मोठा परतावा देखील मिळाला. त्यामुळे या ऍपची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत गेली. ज्यांनी हजारो रुपये गुंतवले होते अशा लोकांनी लाखोंची गुंतवणूक या ऍपमध्ये केली. मात्र मागच्या काही दिवसापासून या ऍपमधून पैसे विथड्रॉ होत नसल्याने हे पैसे बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून आज काही फसवणूक झालेले लोक पोलिसात तक्रार देण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram