Solapur : सोलापुरात अवैध हातभट्टी चालकांची मुजोरी, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल ABP Majha
Continues below advertisement
सोलापुरात अवैध हातभट्टी चालकांची मुजोरी पाहायला मिळाली. अवैध हातभट्टी दारु अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात महिला पोलीस कर्मचारी प्रियंका कुटे जखमी झाल्यात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांना मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक याठिकाणी कारवाई करायला गेले असताना हा हल्ला झालाय. यावेळी हातभट्टी दारुसाठी वापरण्यात येणारं १ हजार ४८० लिटर रसायन नष्ट करण्यात आलंय. एकूण ३ लाख ४३ हजार हजाराचा मुद्देमाल या कारवाईत नष्ट करण्यात आलाय..
Continues below advertisement
Tags :
Solapur Injured Action Excise Department Police Personnel Illegal Hand Furnace Mujori Alcohol Den Attack On Squad Priyanka Kute