Solapur Strike : सोलापुरात आंदोलनामध्ये बाचाबाची, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप
सोलापूर विमानतळासंदर्भात सुरु असलेल्या आंदोलनावरुन बाचाबाची झाल्याचं समोर आलंय. बंदुक दाखवून धमकावल्याचा आरोप सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शाह यांनी केला. सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांनी धमकावल्याचा आरोप केतन शाह यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.... दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना मोबाईलवरील रेकॉर्डिंग थांबवण्याचे प्रयत्न काडादींच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचंही शाह म्हणाले.
विशेष म्हणजे सोलापूर पोलिसांना सुरक्षेसाठी मेसेज केलेला असतानाही पोलिसांनी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप केतन शाह यांनी केला...या संपूर्ण प्रकरणी धर्मराज काडादी यांच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे..