ताशी 130 किमीहून वेगवान रेल्वे गाड्यांमधून स्लीपर, जनरल डबे हटवणार, सर्व डबे आता वातानुकूलित
ताशी 130 किमी हून अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील स्लीपर कोच आणि जनरल डब्बे हटवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. त्यामुळे धीम्या गतीनं चालणाऱ्या पॅसेंजर गाड्या आणि लोकल गाड्या वगळून सर्व गाड्यांमध्ये केवळ वातानुकूलित म्हणजे एसी कोच असणार आहेत. मेल आणि एक्स्प्रेस गाड्या ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगानं चालवण्याची तयारी रेल्वे करत आहे. या गाड्यांमधील एसी कोचचं तिकीटही तुलनेनं कमी असणार आहे. याचा अर्थ सर्वच गाड्यांमधील स्लीपर आणि जनरल डबे हटवले जातील असा नाही. बऱ्याच गाड्या तासी 120 किमी वेगाने धावतात. त्यामुळे त्या गाड्यांमध्ये स्लीपर आणि जनरल डबे कायम राहणार आहेत.
Tags :
Trains Update Train News Railway Department Akshay Bhatkar Railway News Indian Rail Indian Railway