#MarathaReservation मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावर स्थगिती लावल्यानंतर, चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठा संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. एक मराठा, लाख मराठाची घोषणा देत, आज मराठा क्रांती मोर्चा मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घेत हे आंदोलन करण्यात येत आहे. कुर्ला, वडाळा, चेंबूर, मानखुर्द, वरळी, वांद्रे, बोरिवली, कांदिवली, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Maratha Aarakshan New Delhi State Government Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra Supreme Court SEBC Act Maratha Reservation