JJ Hospital सफाई कर्मचारी मृत्यू प्रकरणी कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या मागणीवरुन कर्मचारी आक्रमक
Continues below advertisement
मुंबई: जे.जे. रुग्णालयात एका सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या इतर सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृत्यू पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करा अशी मागणी या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Continues below advertisement