Farmer Loss | नांदेडमध्ये अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचं नुकसान, भाजीपाला, फळभाज्या भुईसपाट

सांगली : राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. काही ठिकाणी पंचनामे देखील सुरू झाले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल लवकरच येईल. तो आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola