Sindhudurg Rescue : देवगड समुद्र किनारी ५ विद्यार्थी बुडाले, चौघांचे मृतदेह मिळाले : ABP Majha

सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये काल समुद्रात पाच पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यामध्ये ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. पण अजून एक मृतदेह पोलिसांना सापडला नाही. तो मृतदेह शोधण्यासाठी आता पुन्हा शोधमोहिम सुरु करण्यात आलीये.  समुद्रात आंघोळीसाठी हे पाच पर्यटक उतरले होते. हे पाचही जण पुण्याचे असल्याची माहिती आहे. तसंच आज जिल्हाधिकारी किशोर तावडे हे देखील घटनास्थळी भेट देणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून कालच्या घटनेचा तपशील घेतला. तसंच या घटनेविषयी मुख्यमंत्र्यांनीही  शोक  व्यक्त केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola