Sindhudurg Political Update :Rajan Teli -Deepak Kesarkarआमने-सामने, राज्यात सत्ता एकत्र मात्र..

Continues below advertisement

राज्यात सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे... मात्र असं असलं तरीही हे दोन्ही पक्ष सावंतवाडी मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात किंवा सिंधुदुर्गात कोणत्याही निवडणूका डोळ्यासमोर नसतानाही तळकोकणात राजकीय शिमगा पाहायला मिळत आहे... सावंतवाडीत झालेल्या भाजपच्या विजयी मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दीपक केसरकर यांचं नाव न घेता त्यांनी आणलेले प्रकल्प चोरीला गेले अशी पोलिसात तक्रार देऊ म्हणत त्यांचं अपयश दाखवण्याचा प्रयत्न केला. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भाजपच्या पालकमंत्र्यांनाच टार्गेट केलंय..  भाजप कार्यकर्त्याना आवरल नाही तर देवेंद्र फडणवीस यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद घ्यावं लागेल असा इशारा केसरकरांनी दिलाय. तर दोघांनीही एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी दिलाय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram