Sindhudurg Rain : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, 2 मध्यम आणि 11 लघु प्रकल्प तुडुंब भरले
सध्या राज्यभरात मुसळधार पावसाची धुव्वादार बॅटींग सुरु आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये साचलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २ मध्यम प्रकल्प तर ११ लघु प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. सिंधुदुर्गात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे जिल्हयात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.