Narayan Rane Sabha : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 26 जूनला केंद्रीय मंत्री नारायण राणेंची सभा

भाजपनं कोकणात देखील लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या २६ तारखेला राजापूरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंची सभा होणार आहे. या सभेला  सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. 26 जूनला दुपारी चार वाजता राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर ही जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सहसंयोजक प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली. एकूणच, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजप लढवणार आहे हे ठरलंय का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola