Maharashtra Rain Update : Sindhudurg मध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर, निर्मला नदीला पूर
सलग चौथ्या दिवशी सुरु असलेल्या पावसामुळे कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आलाय. या पुरामुळे २७ गावांचा संपर्क तुटलाय. आंबेरी पुलावर पुराचं पाणी आलंय. त्यामुळे कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. काही अतिउत्साही वाहनचालक पुलावर पाणी असतानाही दुचाकी घेऊन जात असल्याचं पाहायला मिळालं...