Sindhudurg किल्लापरिसरातील अरबी समुद्रात होणार भारतीय नौसेना दिन साजरा, मोदी स्वतः राहणार उपस्थित
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्लाच्या आजूबाजूच्या अरबी समुद्रात येत्या 4 डिसेंबरला भारतीय नौसेना दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषगाने प्राथमिक तयारीचा एक महत्वपूर्ण टप्पा वेस्टर्न नेव्हल कमांड प्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्रिपाठी यांनी तारकर्ली येथे नौदल, बदर, महसूल, मत्स्य आदी विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन टेहळणी बुरुजावरून सागरी परिसराची पाहणी केली.
Continues below advertisement