Chipi Airport :सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून 18 मार्चपासून बंगळुरू-हैदराबादपासून विमानसेवा सुरु
कोकणवासियांसाठी मोठी बातमी आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून १८ मार्चपासून बंगळुरू आणि हैदराबादपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. फ्लाय ९१ या कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात येतेय. सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी बेंगळुरकरिता, तर मंगळवार आणि शनिवारी हैदराबादकरिता विमानसेवा सुरू होत आहे. तिकीट दर २१०० रु. असणार आहे.