Malls Reopen Request | राज्यभरातील मॉल्स उघडण्याची परवानगी द्या, संघटनेची मागणी,करोडोंची उलाढाल ठप्प

Continues below advertisement
लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील मॉल संस्कृतीदेखील पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईसह राज्यभरातील मॉल्स मालक चालकांची संघटना असलेल्या शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीनं हे मॉल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यभरात या संघटनेचे जवळपास 75 मॉल्स आहेत. ज्यापैकी 50 टक्के मॉल्स हे मुंबईत आहेत, 20 टक्के पुण्यात आहेत. दमहिना यापैकी प्रत्येक मॉलकडून हजारो कोटींची उलाढाल होत असते. त्यातून सर्वात मोठा हिस्सा हा सरकारी तिजोरीत महसूलाच्या रूपातून पडत असतो. त्याचबरोबर जवळपास 50 लाख कुटुंब ही याच मॉल्सवर आपला उदरनिर्वाह चालवतात. हा सारा कामगारवर्ग हाताला कान नसल्यामुळे गेले चार महिने घरात बसून आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात बेरोजगारीही वाढलेली आहे. त्यामुळे अनलॉक ३ मध्ये मॉल्स उघडण्याची परवानगी संघटनेकडून मागितली गेलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram