Ram Mandir | मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराच्या भूमीपूजनेला न जाण्याचा मेमन यांचा सल्ला, तर मशिदीच्या उद्घाटनाला जायचं का शिवसेनेचा सवाल

आमदार प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांना उत्तर दिलंय. माजिद मेमन यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यात सहभाग न होण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले ‘शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. राज्यातील महविकास आघाडीचं सरकार केवळ भाजपच्या विरोधात एकत्र आलं आहे. त्यामुळे आपला अजेंडा सोडण्याचा विषयच़ येतं नाही, शिवसेनेचा अजेंडा हा हिंदुत्वाचा आहे. तो अजेंडा शिवसेना कधीही सोडणार नाही.’ सोबतच राम मंदिराच्या भूमीपूजनेला नाही जाणार तर मशिदीच्या उद्घाटनाला जायचं का असा सवालही त्यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola