Ayodhya Ram Mandir | राममंदिरासाठी घोषित केलेले एक कोटी जमा केले, पोहोचही मिळाली, शिवसेनेचा दावा

Continues below advertisement
शिवसेनेने राममंदिरासाठी एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती. मात्र अजून यातील एक रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. मात्र 27 जुलैला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दान ट्रस्टकडे जमा केल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. 28 तारखेला हे पैसे जमा झाल्याची पोहच आली असाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टला पैसे मिळाले की नाही, असा संभ्रम आता निर्माण झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram