Mahadev Jankar| हजारोंच्या सभा घेणारे जानकर दऱ्याखोऱ्यात का भटकले? कधी ध्यानधारणा,पूजाअर्जा,कधी शेती

राज्यात अनपेक्षितपणे सत्तांतर झाले आणि हाती आलेली सत्ता निघून गेल्याने भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांना झटका बसला. यात काही नव्याने सत्तांतरासाठी देव पाण्यात घालून वाट पाहत बसले तर कोणी त्याचे स्वप्नरंजन करीत. मात्र सध्या असलेल्या कोरोनाच्या संकटात राज्याचे माजी दुगधविकास मंत्री महादेव जानकर यांनी थेट गेले 4 महिने दऱ्याखोऱ्यात राहून सन्यस्त जीवनाचा आनंद घेतला आहे. गेले चार महिने लुंगी बांधून जगणारे जानकर आज सुरु झालेल्या दूध आंदोलनात आपल्या नेहमीच्या स्टाईलने प्रकटले. मात्र या चार महिन्यातील जीवनात जे मिळविले ते गेल्या 35 वर्षातील जगमगाटाच्या जीवनात मिळाले नसल्याची खंत जानकर यांनी एबीपी माझाशी दिलखुलास बातचीत करताना व्यक्त केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola