Shivbhojan | शिवभोजन थाळी अखेर ग्राहकांसाठी उपलब्ध, प्रजासत्ताक दिनी शुभारंभ! उपमुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

Continues below advertisement
देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. महाविकासआघाडी सरकारचा कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवत पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित शिवभोजन थाळीचं अखेर उद्घाटन केलं आहे. ग्राहकांना आता केवळ दहा रुपयात संपूर्ण थाळीचा आस्वाद घेता येणार आहे, मात्र ग्राहकांना काही अटीतटींची पूर्तता करावी लागेल, तरंच या थाळीचा लाभ घेता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या बाहेरील निशिगंधा हॉटेलमध्ये थाळीचं उद्घाटन करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram