Shirdi Saibaba Temple : द्वारकामाईचं दक्षिणद्वार साईभक्तांसाठी खुलं,भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण
कोविड संकटानंतर तब्बल 22 महिन्यानंतर द्वारकामाईचे स्वतंत्र असलेले दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार खुले झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपुर्वी 17 मार्च 2020 पासुन साईमंदीर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. 16 नोव्हेंबर 2020 रोजी साईमंदीर दर्शनासाठी अटी शर्तीसह खुले झाले मात्र जिल्हा प्रशासनाने आत आणि बाहेर जाण्यास एकच गेटची व्यवस्था सुरू ठेवण्यास मान्यता दिल्याने द्वारकामाईचे दक्षिण द्वार बंद ठेवण्यात आले ते दुस-या लाटेतही बंदच होते मात्र आता 22 महिन्यानंतर द्वारकामाई चे स्वतंत्र दर्शन भाविकांना घेता येणार आहे. द्वारकामाई मध्ये साईबाबा 60 वर्ष वास्तव्यास होते. साईंबाबांनी सुरू केले ली धुणी आजही याठिकाणी अविरत सुरू आहे. देश विदेशातील लाखो भाविकांचे द्वारकामाई हे श्रद्धास्थान आहे.