Aurangabad : महावितरणाच्या थकीत वीजबिलाबाबत फेक मॅसेज पाठवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार
महावितरणच्या नावाने बनावट मेसेज पाठवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या काही घटना घडल्यात. वीज बिल भरलं नाही तर रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार असे मेसेज ग्राहकांना पाठवले जातायत. असे मेसेज पाठवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत आदेश दिलेत. बिलासंदर्भातील फेक मेसेज आणि लिंककडे ग्राहकांनी दुर्लक्ष करावं असं आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी केलंय.