Shirdi temple trust Dissolves : शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

जगप्रसिद्ध शिर्डीतील साईबाबा मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलंय..तसंच दोन महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंजपीठाने दिले आहेत. सध्याच्या विश्वस्त मंडळाची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात उत्तमराव शेळकेंनी याचिका केली  होती.. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय दिला. दरम्यान नवीन विश्वस्त मंडळ नेमेपर्यंत जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती कामकाज पाहणार आहे.. या समितिला दैनंदिन खर्चासंदर्भातले अधिकार असतील. मात्र धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola