Kisan Sabha Morcha | 'देशाच्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रातील सत्ताधाऱ्यांना कवडीची आस्था नाही'- शरद पवार

मुंबई :  दिल्लीला सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रामधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले. या मोर्चाला महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी मोर्चाला संबोधित केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल व शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही. 60 दिवस झाले उन्हातान्हात थंडी वाऱ्याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी कधी त्यांची चौकशी केली का? असा सवाल अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola