शरद पवारांनी कृषी विधेयकाला विरोध केलेला नाही, निलंबित खासदारांच्या कृतीला पवारांचं समर्थन - फडणवीस

Continues below advertisement
नवी दिल्ली : राज्यसभेत निलंबन झालेल्या आठ खासदारांनी अख्खी रात्र संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून काढली. जितका अभूतपूर्व राज्यसभेतला राडा होता तितकंच अभूतपूर्व हे आंदोलन होतं. अनेक खासदार दिवसभर या आंदोलकांना भेटून आपला पाठिंबा व्यक्त करत होते. पण सकाळी तर आणखी कमाल झाली. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हेच स्वत: चहा-पोहे घेऊन या खासदारांना भेटण्यासाठी पोहोचले. अर्थात या खासदारांनी त्यांचा चहा नम्रपणे नाकारला. कारण विधेयक मागे घेत नाही तोवर आपला विरोध कायम ही त्यांची भूमिका आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram