शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदेंनी एकमेकांना भरवली द्राक्ष! किंग बेरी द्राक्ष वाणाचं पवारांच्या हस्ते लोकार्पण
सोलापूर: राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शरद पवारांनी मला करंगळीला पकडून राजकारणात आणलं, दिल्लीत मी त्यांच्या सोबत सरकारमध्ये बसलो. आमच्यात कोणतंही अंतर नाही असे प्रतिपादन काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. ते सोलापूरातील द्राक्ष वाणाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.