Eco-Friendly Ganesha | शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती, पुण्याच्या हॅंडमेड पेपर इन्स्ट्यिट्युटतर्फे निर्मिती

Continues below advertisement

पर्यावरणपुरक गणपती मूर्ती म्हणजे आपल्याला शाडूच्याच गणपतीची मूर्ती माहिती आहेत, पण पुण्यातील ‘हॅंडमेड पेपर इन्स्टिट्यूट’ने एक वेगळा प्रयोग केला आहे. या इन्स्टिट्यूटकडून कागदाचा लगदा आणि शाडूची माती यापासून गणपतीच्या मजबूत आणि सुंदर अशा गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. पेणच्या मूर्तीकारांनी या शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. हॅंडमेड पेपर इन्स्टिट्यूट’मधून पेणला कागदाचा लगदा पाठवण्यात आला आणि तिथे या मूर्ती बनवून विक्रीसाठी पुण्यात आणण्यात आल्या आहेत. शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणपुरक असल्या तरीही त्या नाजूक असतात. बऱ्याचवेळा वाहतूक करताना त्या तुटतातही. पण यामध्ये कागदी लगदा टाकल्यामुळे त्यांना मजबूती येते असं सांगण्यात आलं. तसंच या मूर्तींची घरच्या घरी सोप्या पद्दधतीने विसर्जनही करता येणार आहे. शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून मूर्ती बनवण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचंही इन्स्टीट्यूटकडून सांगण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram